Take a fresh look at your lifestyle.

तर, ताटातूनच गायब होईल तांदूळ; भात खाण्याचेही वांधे होण्याची शक्यता..!

वाशिंग्टन :

Advertisement

जागतिक तापमानवाढ आणि त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा कोणालाही तपास नाही. मात्र, बदलते हवामान, पाण्याची कमतरता आणि ग्लोबल वार्मिंगमुळे पुढील ३० वर्षांत लोकांच्या जेवणाच्या ताटातून तांदूळ गायब होईल अशी शक्यता व्यक्त झाली आहे.

Advertisement

भारतीयांच्या रोजच्या आहारात तांदळाचे विशेष महत्व  आहे. देशातील कोट्यावधी नागरिक रोजच्या आहारात भात खातात. आपल्याकडे तांदूळ स्वस्त मिळत असल्याने देखील तांदळास मोठी मागणी असते. त्यामुळे निदान भारतीयांच्या  बाबतीत तरी तांदळास महत्व आहेच. असे असताना मात्र येत्या काही वर्षांमध्ये जेवणाच्या ताटातून भात आणि तांदळापासून बनवलेले पदार्थ गायब होण्याची भीती आहे.

Advertisement

बदलते हवामान, पाण्याची कमतरता आणि ग्लोबल वार्मिंगमुळे पुढील ३० वर्षांत लोकांच्या जेवणाच्या ताटातून तांदूळ गायब होणार आहे. इलिनॉय विद्यापीठाच्या अमेरिकन संशोधकांच्या पथकाने भारतातील जगातील सर्वात मोठ्या तांदूळ उत्पादक क्षेत्रात अभ्यास केला.

Advertisement

विद्यापीठाच्या अहवालात सन २०५० पर्यंत तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मातीच्या संवर्धनासाठी आणि पिकांसाठी केला नाही तर, भविष्यात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. या पथकाने बिहारमधील ‘नॉर्मन बोरलॉग इन्स्टिट्यूट’ च्या भात उत्पादन केंद्रावर आपले संशोधन केले आहे.

Advertisement

वर्ष २०५० पर्यंत तांदळाचे उत्पादन आणि पाण्याची मागणी याचा अंदाज बांधण्याचे उद्दिष्ट संशोधनात ठेवले होते. बदलत्या हवामानाचा तापमान, पाऊस आणि कार्बन डायऑक्साईडवर परिणाम होतो. तांदळासारख्या पिकांच्या वाढीसाठी या घटकांची आवश्यकता आहे.

Advertisement

या घटकांचा समतोल बिघडला, अथवा त्यांच्यावर परिणाम झाल्यास तांदूळ उत्पादनाला फटका बसू शकतो, असे या विद्यापीठातील कृषी व जैविक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकानी सांगितले आहे. या संशोधात या काही महत्वाच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

Advertisement

Leave a Reply