Take a fresh look at your lifestyle.

म्हणून गृहखात्यात बदलाची शक्यता; पहा नेमक्या काय घडामोडी घडतायेत दिल्ली-मुंबईत..!

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची कार सापडण्याच्या प्रकरणामुळे अवघ्या मुंबई पोलिसांची आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची मोठी बदनामी झाली आहे. सगळे काही संशयाच्या भोवऱ्यात फिरत असल्यासारखे मुंबईत चित्र आहे. त्यामुळे आता गृहखात्यात बदल होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपला बळ मिळाले आहे. त्यातच मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणामुळे आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणामुळे पोलीस खात्याबद्दल चर्चेला उधाण आलेले आहे. अशावेळी भाजपने गृहखात्यात बदलाची मागणी केली आहे.

Advertisement

आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर आता गृहमंत्री सुद्धा बदलणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर किती मोठा दबाव आहे, हे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

संपूर्ण प्रकरणात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आणि माध्यमांतून दबाव सुरू असतानाच गृहमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पवारांची भेट घेणे यातून चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांनी मोठ्या विश्वासाने गृहखात्याची जबाबदारी अनिल देशमुख यांना दिली आहे. त्यामुळे आता पवार साहेब याप्रकरणी किती दिवस अनिल देशमुख यांच्या पाठीमागे उभे राहतात, की दिल्लीतील बैठक त्याच बदलाच्या मुद्द्यावर झाली, याबाबतचे आडाखे लावले जात आहेत.

Advertisement

मात्र, एकूण पवारांची कार्यशैली आणि महाविकास आघाडी सरकारची गरज लक्षात घेता गृहखात्यात बदलाची शक्यता कमीच असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, तरीही राजकारणात काहीही शक्य असल्याचे लक्षात घेऊन भाजपने देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी दामटली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply