Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. शेतकऱ्यांना बसतोय तिहेरी फटका; पेट्रोल दरवाढीमुळे ‘त्या’ घटकासाठी होतोय जास्तीचा खर्च..!

पुणे :

Advertisement

आगामी खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच उन्हाळी हंगामातील फळबागा व भाजीपाला पिकांची काळजी शेतकरी घेत आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांना आता डीझेल दरवाढीसह खतांच्या किंमत वाढीचा झटका सहन करावा लागत आहे.

Advertisement

पेट्रोल व डीझेल यांची दरवाढ हा सर्वच गोष्टींच्या भाववाढीसाठी पोषक असा मुद्दा आहे. त्यामुळे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि इंधन कंपन्यांना या दरवाढीमुळे अच्छे दिनाची अनुभूती आलेली असली तरी शेतकरी आणि सामान्य कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

Advertisement

रासायनिक खत आणि पाईपलाईन यांचाही जवळचा संबंध आहे. पेट्रोलिअम पदार्थांचे भाव वाढलेले असल्याने पाईप कंपन्यांनी पाईपसाठी रासायनिक भुकटी मिळत नसल्याने भाव थेट दुप्पट केले आहेत.

Advertisement

आता त्यात भर पडली आहे ती रासायनिक खतांच्या वाढीची. होय, या दरवाढीचाही फटका शेतकऱ्यांना आता बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाचे दर, केंद्र सरकारची इंधन दरवाढ, डाॅलरचा वधारलेला भाव या सर्व कारणांमुळे रासायनिक खत उत्पादक कंपण्याचा खर्च वाढल्यामुळे खताचे भाव वाढले आहेत.

Advertisement

खताचे भाव असे : (आकडेवारी रुपयांमध्ये)

Advertisement
खतआधीचे भावआताचे भाव
डीएपी१२२५१५००
२०-२०-०९५०११२५
१०-२६-२६११६०१४००
१२-३२-१६१२००१४२०
१५-१५-१५१०४०१२००

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply