Take a fresh look at your lifestyle.

वाझेप्रकरणी मिळाले आणखी एक सीसीटीव्ही फुटेज; म्हणून तपासाला येत आहे वेग..!

मुंबई :

Advertisement

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणामध्ये नवनवे पुरावे आणि धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. वाझे यांनीही आता पोलिसांना मदत करण्यास सुरुवात केल्यासह राष्ट्रीय तपास संस्थेने याला गती दिल्याने तपासाला वेग आलेला आहे.

Advertisement

आणखी एक सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने वाझे आणि मृत असलेल्या मनसुख हिरेन यांच्या प्रकरणामध्ये पोलिसांना गती येत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडलेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने यातील पाळेमुळे खोडून काढल्याने पुढील काळात आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

Advertisement

एनआयए आणि एटीएसने सीसीटीव्हींची तपासणी केली असता १७ फेब्रुवारीला हिरेन आणि वाझे यांच्यात फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत १० मिनिटे चर्चेचे फुटेज सापडले आहे. हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते. आपली स्कॉर्पिओ मुलूंड -ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता. याचा दरम्यानचे हे फुटेज आहे.

Advertisement

हिरेन यांनी सीएसएमटीला ज्या ओला कॅबने प्रवास केला त्याच्या चालकाने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान हिरेन यांना पाच वेळा फोन आला होता. वाझे यांनीच हे फोन केल्याची पोलिसांना शक्यता वाटत आहे. अखेरच्या फोनला लोकेशन बदलल्याने यास आणखी पुष्टी मिळत असल्याचे समजते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply