Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेत पडली उभी फुट; भुमरे, सत्तार, दानवे यांची भाजपशी हातमिळवणी, खैरे काँग्रेससोबत..!

औरंगाबाद :

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यात राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेत उभी फुट पडली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची साथ दिली आहे. तर, शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगीही न घेता भाजपच्या पॅनलकडून उमेदवारी केली आहे.

Advertisement

या दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका केल्याने आता मुंबईतील पक्षाचे धुरीण याप्रकरणी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २१ मार्च रोजी आहे. या निवडणुकीत भाजपचे नेते अामदार हरिभाऊ बागडे, माजी अामदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने उमेदवार उभे केले आहेत.

Advertisement

तर, दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार विकास पॅनलने भाजपच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. ल्या वेळी ही बँक भाजपच्या ताब्यात हाेती. त्यामुळे त्यांच्या हातातून सत्ता काढून घेण्यासाठी या वेळी महाविकास अाघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवतील अशीच शक्यता होती. मात्र, सेनेमध्ये उभी फुट पडली आहे.

Advertisement

शिवसेनेेचे दिग्गज नेते मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अामदार अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे अामदार सतीश चव्हाण यांनी भाजपशी घरोबा केला आहे. कॉंग्रेसच्या गटाने शिवसेनेेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचे समर्थन मिळवले अाहे.

Advertisement

अंबादास मानकापे, माजी आमदार सुभाष झांबड, जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, नंदू घोडेले अादींनी माजी खासदार खैरे यांची साथ दिली आहे. बँक वाचवण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात अामचे पॅनल उभे अाहे. बागडे जिल्हा दूध संघाचे चेअरमन असताना त्यांनी जिल्हा बँकेतील ठेवी काढून जनता सहकारी बँकेत ठेवल्या हाेत्या. आघाडी सरकारमुळे जिल्हा बँकेला साडेआठ कोटी नफा मिळाला अाहे. मात्र विराेधी पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार घोटाळ्यात बुडालेले आहेत, असा आरोप करून कल्याण काळे यांनी जोरदार टक्कर देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply