Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मुंबई पोलिसांचा तो फोटो होतोय व्हायरल; पहा काय म्हटलेय मंत्री पाटलांनी

मुंबई :

Advertisement

एकीकडे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांची नकारात्मक चर्चा सुरू असतानाच एक महत्वाचा फोटोही सोशल मिडीयाच्या टट्रेंडमध्ये आला आहे. त्या फोटोमध्ये पोलिसांचा सेवाभाव आणि कर्तव्यदक्षता दिसत असल्याने अनेकांना याचे कौतुक वाटत आहे.

Advertisement

वरळी सी फेस येथील चौकातील हा फोटो आहे. त्या फोटोमध्ये एक पोलीस अधिकारी / कर्मचारी भर रस्त्यात झाडू घेऊन काचा बाजूला करताना दिसत आहेत. वाहतूक पोलीस असलेल्या या व्यक्तीने अनेकांच्या मनात घर केले आहे.

Advertisement

Satej (Bunty) D. Patil on Twitter: “सलाम या कर्तव्यनिष्ठेला! वरळी सी-फेस येथील चौकात वाहतूक नियंत्रण करत असलेल्या वाहतूक पोलीस अंमलदाराने अपघात झालेल्या वाहनांच्या फुटलेल्या काचा स्वतः हातात झाडू घेऊन बाजूला केल्या. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. @MumbaiPolice https://t.co/pdhAo6vZGr” / Twitter

Advertisement

यावर महाविकास आघाडी सरकारचे मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, सलाम या कर्तव्यनिष्ठेला! वरळी सी-फेस येथील चौकात वाहतूक नियंत्रण करत असलेल्या वाहतूक पोलीस अंमलदाराने अपघात झालेल्या वाहनांच्या फुटलेल्या काचा स्वतः हातात झाडू घेऊन बाजूला केल्या. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.

Advertisement

तर, त्यावर विशाल काळे, आनंद मुसळे, अयोध्या पौळ आदींनी पोलिसांच्या या कर्तव्यभावनेने काम करण्याच्या फोटोला लाईक केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply