Take a fresh look at your lifestyle.

ऐकावे ते नवलंच : म्हणून उलट दिशेने धावली होती ट्रेन..!

दिल्ली :

Advertisement

पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी टनकपुरपासून काही अंतरावर खटीमाजवळ अचानक उलट दिशेने धावायला लागल्याची आश्चर्यकारक बातमी आपण वाचली आहे ना? ही बातमी जितकी आश्चर्यकारक आहे, त्यापेक्षाही ही उलट धावायला लागल्याचे कारण आश्चर्यदायी आहे.

Advertisement

होय, ही ट्रेन उलट दिशेने नेमकी का धावली, याचा तपास करताना आणखी एक आश्चर्यकारक माहिती पुढे आलेली आहे. ड्रायव्हरने रेल्वे ट्रॅकवर आलेल्या मुक्या जनावरांना वाचवण्यासासाठी अचानक ब्रेक लावला होता. दरम्यान ब्रेकमध्ये तांत्रिक खराबी झाली आणि ट्रेन अचानक उलट दिशेने धावू लागली, अशी प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे.

Advertisement

रेल्वे विभाग याच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहे. अचानक ट्रेन उलट दिशेने धावल्याच्या या घटनेने अनेकांना जसा धक्का बसला होता. तसेच ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, दरम्यान, कुठेही अपघात न झाल्याने सगळे सुखरूपपणे पुन्हा प्रवासाला लागले.

Advertisement

ANI on Twitter: “#WATCH | Purnagiri Jansatabdi train runs backwards due to cattle run over b/w Khatima-Tanakpur section in Uttarakhand. Incident happened earlier today. There was no derailment & passengers were transported to Tanakpur safely. Loco Pilot & Guard suspended: North Eastern Railway https://t.co/808nBxgxsa” / Twitter

Advertisement

या घटनेत 35 किलोमीटरपर्यंत रिव्हर्स येऊन ट्रेन खटीमा यार्डजवळ थांबली होती. रेल्वे उलट्या दिशेने धावल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. तसेच ट्रेन रिव्हर्स येताना अनेकांनी ट्रेनचा व्हिडिओदेखील काढला. ट्रेन थांबल्यानंतर रेल्वे विभागाने सर्व प्रवाशांना बसद्वारे टनकपुरला पाठवले.

Advertisement

मात्र, ब्रेक अशा पद्धतीने खराब झाल्यावर ट्रेन उलट धावली कशी, याचे कोडे अजूनही रेल्वे अधिकाऱ्यांना उलगडलेले नाही. त्यामुळे याप्रकरणी चालकाची जबानी घेण्यासह सर्व तांत्रिक मुद्दे तपासले जात आहेत. भविष्यात अशी घटना घडून दुर्घटना घडणार नाही, याची काळजी म्हणून सर्व बाजू तपासल्या जात आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply