Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘रिलायंस’च्या ‘फ्युचर’ला झटका; पहा नेमके काय म्हटलेय न्यायालयाने

मुंबई :

Advertisement

दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या याचिकेच्या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फ्युचर ग्रुप आणि रिलायंस ग्रुप यांच्यातील बिग बाजार व्यवहार पुढे न नेण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

रिलायन्स ग्रुपने फ्युचर ग्रुपच्या रिटेल व्यवसायास 24,713 कोटी रुपये इतक्या मोठ्या रकमेने खरेदी केले आहे. या प्रकरणात हाय कोर्टाने सिंगापूर लवादाचा आदेश कायम ठेवला आहे. हाय कोर्टाने म्हटले आहे की, फ्यूचर समूहाने जाणीवपूर्वक लवादाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.

Advertisement

Press Trust of India on Twitter: “HC directs Future Retail not to take further action on Reliance deal; holds that it wilfully violated Singapore Arbitrator’s order” / Twitter

Advertisement

कोर्टाने किशोर बियाणी आणि फ्यूचर ग्रुपमधील इतरांची संपत्ती संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. यासह कोर्टाने फ्यूचर ग्रुपच्या संचालकांना पीएम रिलीफ फंडामध्ये 20 लाख रुपये जमा करण्याचेही आदेश दिले आहेत. बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना या पैशांतून कोरोना विषाणूची लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने फ्युचर ग्रुपच्या बिग बाजार आणि इतर रिटेल व्यवसायाची खरेदी केली आहे. त्यावेळी फ्युचर ग्रुपने यापूर्वी केलेल्या कराराचा भंग केल्याचा आरोप अमेझॉन कंपनीने केला होता. त्यावर सिंगापूर येथील लवादाने अमेझॉनच्या बाजूने निकाल दिला होता.

Advertisement

दरम्यान, याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी चालू होती. दिल्ली कोर्टाने लवादाचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे आता अमेझॉन इंडिया यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply