Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ युझर्सना ‘नेटफ्लिक्स’ देणार झटका; पहा काय तयारी केलीय त्यांनी

मुंबई :

Advertisement

मित्र किंवा नातेवाईक यांचा युझर आयडी आणि पासवर्ड उसना घेऊन दणक्यात मनोरंजन करून घेणाऱ्या बहाद्दरांना आता ‘नेटफ्लिक्स’चा झटका बसणार आहे. कारण, अशा कार्यवाही लक्षात घेऊन त्यावर आळा घालण्यासाठी ही कंपनी ठोस तांत्रिक बदल करणार आहे.

Advertisement

नव्या फीचरची चाचणी मर्यादित युजर्समध्ये केली जात आहे. परिणामी सध्या काही युजर्सना नोटीस मिळू लागली आहे. त्यांच्या स्क्रीनवर ‘तुम्ही या खात्याच्या ऑनरसोबत लाइव्ह नसाल तर सेवा सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला आपले खाते उघडण्याची आवश्यकता आहे’ अशा प्रकारचे काही संदेश येत आहेत.

Advertisement

त्यामुळे यापुढे तुम्ही एखाद्या कुटुंबातील सदस्याकडून पासवर्ड घेऊन नेटफ्लिक्सवर एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज पाहत असाल तर त्यासाठी पेमेंट करावे लागू शकते. सब्सक्रिप्शनसाठी एखाद्या नातेवाईक किंवा मित्राचा पासवर्ड घेत पैसे देण्याला टाळाटाळ करणाऱ्यांना ब्रेक लावण्याचा हा प्रयत्न आहे.

Advertisement

कंपनीने  कुटुंबातील सदस्य किंवा मित्राकडून पासवर्ड शेअर करतात त्यांच्यासाठी ही चाचणी यासाठी डिझाइन केली. जे अकाउंट युजर्स अधिकृत आहेत, त्यांनीच केवळ याचा वापर करावा असे आता कंपनीचे म्हणणे आहे. याचा फटका भारतातील लाखो युझर्सन बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

Advertisement

Leave a Reply