Take a fresh look at your lifestyle.

राहुरी विद्यापीठाच्या सोयाबीन वाणास मान्यता; पहा काय आहेत त्याचे खास फीचर्स

कोल्हापूर / अहमदनगर :

Advertisement

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या केडीएस-९९२ या सोयाबीन बियाण्याच्या वाणास राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्याची मान्यता मिळाली आहे. कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्रामधील सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांनी हा वाण विकसित केला आहे.

Advertisement

केंद्रीय सोयाबीन वाण ओळख व प्रसार समितीच्या इंदोर येथे झालेल्या बैठकीत देशभरातील विविध भागांसाठी उपयुक्त ठरतील असे एकूण आठ वाण प्रसारित करण्यात आले. त्यात केडीएस-९९२ हा सर्वाधिक उत्पादन देणारा वाण ठरला आहे.

Advertisement

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. टी. आर. शर्मा, सोयाबीन अनुसंधान संस्था, इंदोरच्या संचालक डॉ. नीता खांडेकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहायक संचालक डॉ. संजीव गुप्ता यांनी बैठकीत या वाणास पाच राज्यांसाठी शिफारस केली आहे.

Advertisement

कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिलीप कटमाळे, सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख व त्यांच्या सर्व सहकार्यांचे कौतूक करून अभिनंदन केले आहे.

Advertisement

केडीएस-९९२ सोयाबीन बियाण्याची वैशिष्ट्ये अशी :

Advertisement
  • महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा व आंध्रप्रदेश या पाच राज्यांत या वाणाच्या लागवडीसाठी शिफारस
  • दक्षिण भारतात पाने खाणाऱ्या अळीसाठी काही प्रमाणात सहनशील, तर तांबेरा रोगास कसबे डिग्रज येथे मध्यम प्रतिकारक्षम सिद्ध
  • १०० ते १०५ दिवसांत तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाचे दाने मोठ्या आकाराचे
  • उत्पादकता ६ क्विंटल

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply