Take a fresh look at your lifestyle.

अवकाळीची शक्यता; पहा कुठे होऊ शकतोय पाऊस

पुणे :

Advertisement

मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याजोगे वातावरण महाराष्ट्रात झालेले आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवसात राज्याच्या काही भागात दमदार, हलका किंवा गारांसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

Advertisement

कुलाबा वेधशाळेने आठ जिल्ह्यांसाठी ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे. १८ ते २१ जून या काळात मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Advertisement

औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड. भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर, कोकण गोवा विभाग, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या भागात हलका किंवा माध्यम स्वरुपात पाऊस होईल असे म्हटलेले आहे.

Advertisement

महाराष्ट्रावरील चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाला अनुकूल वातावरण तयार झालेले आहे. कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply