Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मंत्री परब आहेत विरोधकांसह राष्ट्रवादीच्याही रडारवर; वाचा त्यांच्यावरील मुद्दे

मुंबई :

Advertisement

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचेे संसदीय कार्य तथा परिवहनमंत्री अनिल परब विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. परबांच्या हस्तक्षेपाबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे तक्रार केल्याची चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

त्यामुळेच आपण पाहूयात की परब यांचे कोणते मुद्दे सर्वांना खटकत आहेत ते :

Advertisement

मुख्यमंत्र्यांचे “सल्लागार’ अशी प्रतिमा उभी राहत असलेले शिवसेनेचेे संसदीय कार्य तथा परिवहनमंत्री अनिल परब हे सगळीकडे दबदबा ठेऊन आहेत.

Advertisement

‘वाझेंचा सरकारमधील ऑपरेटर कोण?’ हा सवाल उपस्थित करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नाव न घेता परब यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच गृहखात्यात त्यांचा हस्तक्षेप असल्याचेही सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत “सहायका’ची भूमिका मंत्री परब यांनीच बजावली होती.

Advertisement

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे असोत वा नितेश राणेंनी आरोप केलेले युवा सेना नेते वरुण सरदेसाईंची खुलाशाची पत्रकार परिषद अशा सर्वच ठिकाणी परब यांचा संचार असतो.

Advertisement

वकील, नगरसेवक आणि विधान परिषदेतील आमदारकीचा अनुभव यामुळेच आघाडी सरकारमध्ये संसदीय कार्यमंत्र्यासारखे अत्यंत महत्वाचे खातेही त्यांच्याकडे आहे.

Advertisement

मंत्री परब यांचे पक्षातील स्थान वाढल्याने शिवसेनेचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि दिवाकर रावतेंना अधिवेशनकाळात आपली असूया लपवता आली नव्हती.

Advertisement

धिवेशनकाळातही मुख्यमंत्र्यांचेे “सल्लागार’ या शब्दांत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी परबांचा अनेकदा जाहीर उल्लेख केला होता. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply