Take a fresh look at your lifestyle.

हरबरा हमीभाव खरेदीला सुरुवात; पहा काय आहेत त्यासाठी नियम-अटी

अहमदनगर :

Advertisement

हरबरा या पिकाची हमीभावाने खरेदी करणारी केंद्र आता महाराष्ट्रात सुरू होत आहेत. त्यासाठी नाफेडच्या वतीने काही नियम आणि अटी जारी करण्यात आलेल्या आहेत. त्या अटींची पूर्तता करूनच शेतकऱ्यांना आपला हरबरा अशा केंद्रांवर विकता येणार आहे.

Advertisement

त्यासाठीचे मुद्दे असे :

Advertisement
  • हरभरा या शेतमालास प्रतिक्विंटलसाठी रुपये ५१०० या प्रमाणे बाजारभाव निश्चित केलेला आहे.
  • शेतक­यांनी आपला हरभरा वाळवून व स्वच्छ करून आणि १२ टक्के आर्द्रता असताना विक्रीसाठी आणावा.
  • शेतकऱ्­यांच्या शेतीमालाची नोंदणी प्रक्रिया व १ मार्चपासून हरभरा खरेदी केंद्रावर सुरू झाली आहे.
  • शेतक­ऱ्यांनी हरभरा या पिकाची ऑनलाइन नोंद असलेला ओरिजनल ७/१२ व ८ अ, आधार कार्ड झेरॉक्स तसेच आधारकार्डशी संलग्न असलेल्या नॅानलाईज बँकेची पासबूक झेरॉक्स ती खाते नंबर व आयएफसी कोड ठळक नोंद असलेले आवयक आहे.
  • जनधन खाते स्वीकारले जाणार नाही.

हरभरा खरेदी केंद्र नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवार या ठिकाणी चालू असल्याची माहिती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष रावसाहेब घिगे यांनी दिली.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply