Take a fresh look at your lifestyle.

योगींच्या उत्तरप्रदेशने मारली जगभरात बाजी; पहा कोणत्या क्षेत्रात आहे त्यांचा जगभरात डंका

दिल्ली :
भौगोलिकदृष्ट्या भारतातील एक मोठे राज्य आणि राजकीयदृष्ट्या सर्वाधिक खासदार असलेल्या उत्तरप्रदेश राज्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एकहाती सत्ता आहे. या राज्यात रोजगार वाढीसह मंदिर आणि फिल्मसिटी उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतानाच जगभरात दखलपात्र ठरलेली आणखी एक बातमी आलेली आहे.

Advertisement

मात्र, ही बातमी काही आनंदवार्ता नाही. उलट भारतीय म्हणून आपण किती चुकत आहोत, हेच आणखी अधोरेखित करणारी आहे. जगभरातील सर्वाधिक प्रदूषित अशा 30 शहरांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. त्या 30 मध्ये एकट्या उत्तरप्रदेश राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे.

Advertisement

प्रदूषणाच्या बाबतीत जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत राजधानी लखनऊ पहिल्या दहामध्ये आहे. ग्रीन पीस संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांमध्ये लखनौ नवव्या क्रमांकावर आहे. यातही आणखी चिंतेची बाब म्हणजे या यादीतील 10 शहरे एकट्या उत्तरप्रदेश राज्याची आहेत.

Advertisement

गाझियाबाद हे जगातील दुसरे सर्वात प्रदूषित शहर आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांपैकी 22 शहरे एकट्या भारतातील आहेत. जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे, तर राजधानीच्या गटात ती पहिल्या स्थानावर आहे.

Advertisement

चीनमधील होटन हे शहर जगाच्या यादीत अव्वल आहे. यानंतर, पहिल्या दहामधील सात शहरे उत्तरप्रदेशातील आहेत. देशातील २२ सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये यूपीमधील १० आणि हरियाणामध्ये 9, तर बिहारमध्ये एक आहे.

Advertisement

प्रमुख प्रदूषित शहरे अशी :

Advertisement
शहररैकिंग
गाजियाबाद2
बुलंदशहर3
बिसरख जलालपुर4
नोएडा6
ग्रेटर नोएडा7
कानपुर8
लखनऊ9
मेरठ12
आगरा17
मुजफ्फरनगर20

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply