Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘त्या’ राज्यपालांनीही घेतली आंदोलकांची बाजू; सांगितला इंग्रज काळातील तो महत्वाचा किस्सा

दिल्ली :

Advertisement

शेतकरी आंदोलनाची दखल न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारपुढील अडचणी दिवसेंदिवस आणखी वाढत आहेत. कारण, याप्रकरणी काँग्रेस व शेतकऱ्यांचा दबाव असतानाच आता एका राज्याच्या राज्यपालांनी भूमिका घेतली आहे.

Advertisement

देशात शेतकरी आणि सरकार यांच्यात परस्पर सामंजस्य होण्याची कोणतीही शक्यता सध्यातरी दिसत नाही. दरम्यान, कृषी कायद्याबाबत मेघालयचे राज्यपाल सतपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे.

Advertisement

एका खासगी कार्यक्रमात पोहोचलेल्या मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, इतके दिवस आंदोलन चालणे कोणालाही आवडणार नाही. एक कुत्रा मेला तरी आमच्या देशातील नेत्यांकडून शोक संदेश येतात. पण इथे 250 शेतकरी मरण पावले आहेत. कुणीही दखल घेतली नाही. हे माझ्या आत्म्याला दुखवते.

Advertisement

इंग्रज काळातील एक उदाहरण सांगताना ते म्हणाले की, शेतकर्‍यांना योग्य भाव मिळत नाही हा मुद्दा आज नाही. ब्रिटीशांच्या काळात मंत्री असलेले छोटूराम आणि व्हायसरॉय यांचीही एक कथा आहे. दुसर्‍या महायुद्धात व्हाईसरॉय हे मंत्री छोटूराम यांना भेटले आणि त्यांच्याकडे धान्य मागितले. त्यावेळी शेतकऱ्यांवर अगोदरच मोठे संकट होते.

Advertisement

छोटूराम इंग्रजांना म्हणाले होते की, सरकारला किती धान्य द्यावे लागेल हे आम्ही ठरवू. मग व्हाईसरॉयने छोटूरामला सांगितले की, मी सैन्य पाठवून धान्य घेईन. मंत्री छोटूरामने उत्तर दिले होते की, तुम्ही असे केल्यास आम्ही शेतकऱ्यांना उभ्या पिकाला आग लावण्यास सांगू. पण तुम्हाला कमी किंमतीत किंवा फुकटात गहू देणार नाही.

Advertisement

एकूणच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपच्या अंतर्गत मोठी खदखद असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. राज्यपाल सतपाल मलिक यांनी हमीभाव हा मुद्दा महत्वाचा असल्याचे म्हटले आहे. त्यावर ठोस निर्णय घेऊन आंदोलन संपू शकते याची त्यांनी आठवण करून दिली आहे.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply