Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कारचा थेट भाजपशीही संबंध; ट्विटनंतर वाढला ट्विस्ट, काँग्रेसने शेअर केले फोटोही

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार, कारमालकाचा मृत्यू आणि नंतर याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना अटक यासह आता यातील कारचा थेट भाजप कार्यकर्त्याशी संबंध असे एकावर एक धक्के महाराष्ट्राला बसत आहेत.

Advertisement

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केल्यावर यातील ट्विस्ट वाढला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता यात भाजपासोबतचे कनेक्शन समोर येत आहे. मनसुख हिरेन वापरत असलेल्या मर्सिडीज १७ फेब्रवारी रोजी ठाणे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या फोटोत दिसत आहे. महाराष्ट्र भाजपाचे नेते यावर खुलासा करतील का?

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “Now BJP connection emerges – the Mercedes car allegedly used by Mansukh Hiren on 17th February is seen in a photograph of BJP office bearer of Thane. Would @BJP4Maharashtra leaders give explanation? https://t.co/w64FAyfDpi” / Twitter

Advertisement

एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात छापा टाकून दोन डीव्हीआर (सीसीटीव्ही चित्रण साठविण्याचे यंत्र), लॅपटॉप, मोबाइल, आयपॅड, संगणक आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. तसेच वाझे यांनी वापरल्याचा संशय असली काळ्या रंगाची मर्सिडीज जप्त केली होती. ही मर्सिडीज आहे. त्यामुळे भाजपाकडून वाझे निशाण्यावर आलेले होते.

Advertisement

या कारमध्ये पैसे आणि नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याने यातील संशय आणखी वाढला होता. त्यातच भाजपने याप्रकरणी आरोपांची राळ उडवून दिल्याने हे प्रकरण सरकारला गोत्यात आणणारे ठरले. मात्र, त्याचवेळी आता ही कार भाजपशी निगडीत पदाधिकाऱ्यांच्या फोटोसह आल्याने आणखी गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply