दिल्ली :
हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. (Ram Swarup Sharma) रामस्वरूप शर्मा यांचे संशयास्पद परिस्थितीत निधन झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी गळ्याला फास लावून घेत आत्महत्या केली आहे. मात्र आत्महत्या करण्याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. दिल्लीतील राममनोहर लोहिया हॉस्पिटलजवळील गोमती अपार्टमेंटमध्ये त्यांचे निवासस्थान आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी स्वत:च्या खोलीत गळफास लावला. दरवाजा आतून बंद होता. त्यांच्या कर्मचार्यांनी बोलवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडला. रामस्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर आज होणारी भाजपा संसदीय पक्षाची बैठक रद्द करण्यात आली आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- अहमदनगर सर्वेक्षण : अशी आहे विकासकामाबाबतची कॉमन भावना; पहा कोण आहे विकाससम्राट..!
- कोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा
- म्हणून रात्री झोपण्याअगोदर प्यायचा असतो गुळ; पहा कोणते फायदे होतात या सध्या गोष्टीमुळे
- या 5 गोष्टी खा आणि उन्हाळ्यात वजन कमी करा; ‘चरबीवान’ मंडळींसाठी आहे ही खास माहिती
- IPL 2021 : दिल्ली कॅपिटल Vs पंजाब किंग्जचे संघ भिडणार; पहा काय असेल प्लेइंग इलेव्हनची लिस्ट