Take a fresh look at your lifestyle.

आजपासून राज्यातील ‘या’ शहरात लागणार नाही एकही लग्न; वाचा, काय झालाय नेमका निर्णय

मुंबई :

Advertisement

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा गतीने पसरतो आहे. कोरोना संसर्ग वाढत असतांना महापालिका प्रशासनानेही जोरदार पद्धतीने कोरोना चाचण्यांची गती वाढवलेली आहे. कोरोनाच्या संसर्गाचे थैमान जगभरात सरु असताना दुसरीकडे कोरोनाचे नवीन स्ट्रेन आढळत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.   

Advertisement

नाशकात आजपासून विवाह सोहळ्यांवर पूर्ण बंदी असणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत शहरातील विवाह सोहळ्यांवर पूर्णत: बंदी असेल.

Advertisement

सहा दिवसात पाचव्यांदा कोरोना बाधितांची संख्या हजारांच्या पार गेली आहे. काल (मंगळवार) दिवसभरात 1354 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना संदर्भातील निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता आहे.

Advertisement

जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमांनुसार किंवा निर्बंधांनुसार येत्या १५ मार्चपासून मंगल कार्यालये, हॉल्स, लॉन्स आणि इतर ठिकाणी ठिकाणी लग्न समारंभ करता येणाक नाहीत. तसेच इतरही गर्दी जमा होईल असे कार्यक्रम आयोजित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply