Take a fresh look at your lifestyle.

डॉ. नामदेव शास्त्री यांनी मांडले ‘हे’ मुद्दे; पंकजा मुंडे व डॉ. खेडकर यांच्यावर डागली तोफ

बीड / औरंगाबाद :

Advertisement

भगवानगड म्हणजे बहुजन समाजातील नागरिकांचे त्यातही वंजारी समाजाचे महत्वाचे देवस्थान. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळात हा गड सामाजिक-राजकीय कारणासाठी सुप्रसिद्ध झाला. देशभरात त्यामुळे याची ओळख झाली. मात्र, मुंडे यांच्यानंतर गवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी गडाला राजकीयदृष्ट्या अलिप्त ठेवले आहे. त्यावर दिव्य मराठी या वृत्तपत्राच्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Advertisement

महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी त्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे असे :

Advertisement

पंकजा यांना वाटतंय की वडील गोपीनाथ मुंडे यांनी गडाला आर्थिकदृष्टया सक्षम करून वैभव प्राप्त करून दिले. प्रत्यक्षात असे काहीही नाही. अर्थात गोपीनाथ मुंडे यांनीच मला गडाच्या गादीवर बसवले हे सुद्धा खरे आहे. पण पंकजा यांना दसऱ्यानिमित्त भाषण करण्याचा मालकी हक्क हवा होता. त्यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशी बिरुदावली मिळाली होती. प्रत्यक्षात त्यांची जनतेशी असलेली नाळ तुटत गेली होती.

Advertisement

गडावरून भाषणबंदी केल्यामुळे पंकजा मुंडे यांनी सत्तेचा दुरुपयोग करत त्रास दिला. यशवंत ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत दहा लाखांचा निधी मिळाला होता. त्यात गडाने दहा लाखांचे योगदान देऊन सभामंडप बांधला. त्यावेळी पंकजा यांच्याकडेच ग्रामविकास मंत्रालय होते. मात्र इतर बांधकामात अडथळा निर्माण करणारा हा सभामंडप असल्याने आम्ही पाडला. पंकजा यांनी याचाच वचपा काढत गडावर दहा लाखांचा दंड ठोठावला. तो आम्ही भरलादेखील. 

Advertisement

भगवान गडाची करोडो रुपयांचे मूल्य असलेली ट्रस्ट डॉ. वाय. एस. खेडकर यांनी लाटली. अगदी त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांनाही वडवणी येथील १७२ एकर जमीन कृषी महाविद्यालयासाठी हवी होती, पण मी ती दिली नाही. श्री भगवान शिक्षण प्रसारक मंडळ डॉ. खेडकर यांची संस्था नसून गडाचीच संस्था आहे. या संस्थेच्या जमिनी कोट्यवधींच्या आहेत.

Advertisement

पंकजा मुंडे-पालवे यांना भाषणाच्या माध्यमातून गडाची मालकी हवी आहे; पण मी समाजाच्या हितासाठी खंबीरपणे विरोध केला. आत्तापर्यंत गडाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी केला गेला. यापुढे अशी चूक कदापी होऊ देणार नाही.

Advertisement

डॉ. खेडकर यांनी भगवानबाबांनी निर्माण केलेली भगवानगडाची औरंगाबादेतील ट्रस्टच लाटली आहे. या ट्रस्टची औरंगाबाद शहरात अजबनगरची जमीन कोट्यवधी रुपये किमतीची आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी बाबांचे उत्तराधिकारी असलेले महंत भीमसिंग यांची संस्थेतून हकालपट्टीही केली होती. खेडकर यांचे शिक्षण बाबांनी केले पण त्यांनी बाबांशी बेईमानी केली.

Advertisement

पंकजा यांना मी गडावरून राजकीय भाषण करू दिले नाही. म्हणून त्यांचा माझ्यावर राग आहे. त्यांच्या पराभवात माझा काहीही वाटा नाही. देवेंद्र फडणवीस यांनी फूस दिली म्हणून मी त्यांना पराभूत करण्याचे समाजाला आवाहन केले, हे साफ खोटे आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply