Take a fresh look at your lifestyle.

3 वेळा खासदार, एकदा केंद्रीय मंत्री; ‘अशी’ होती दिलीप गांधींची कारकीर्द

अहमदनगर :

Advertisement

माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचं आज करोनामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाच्या नियमानुसार दिल्लीमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement

सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते झाले. 1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

Advertisement

नगर शहराच्या राजकारणातही त्यांचा मोलाचा वाटा होता. पक्षाचे ते बराचकाळ शहरजिल्हाध्यक्ष होते. नगर पालिका असताना नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पुढाकारातून सध्या राष्ट्रवादीला सोबत घेत महापालिकेत भाजपची सत्ता आहे. 

Advertisement

दिलीप गांधी 1999 मध्ये अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 29 जानेवारी 2003 ते 15 मार्च 2004 या कालावधीत ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री होते. 2004 मध्ये मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार तुकाराम गडाख यांच्याकडून गांधींना पराभवाचा धक्का बसला होता.

Advertisement

काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड यांचेही करोनामुळे निधन झाले. त्यानंतर आता गांधी यांचे निधन झाले. नगरचे दोन हिंदुत्ववादी नेते करोनामुळे गमावल्याच्या भावना नगरकरांमध्ये आहेत.

Advertisement

2019 मध्ये दिलीप गांधी यांचे तिकीट कापून भाजपने राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी दिलीप गांधी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांधींची भेट घेऊन मनोमीलन केल्याचंही बोललं जात असे. अखेर, सुजय विखेंनी भाजपची जागा राखली.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply