Take a fresh look at your lifestyle.

वाझे प्रकरणात NIA चे प्रमुख खलाटेंची एन्ट्री; वाचा, कोण आहे विक्रम खलाटे आणि काय आहे त्यांचे बारामती कनेक्शन

मुंबई :

Advertisement

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याने आणि त्यात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाझे यांना एनआयएने (Sachin Vaze arrested by NIA) अटक केली आहे. तसेच त्यांना निलंबितही करण्यात आले आहे. 

Advertisement

अशातच आता या प्रकरणात  एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांची एन्ट्री झाली आहे. सध्या एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण तपास सुरु आहे.

Advertisement

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) लवकरच मुंबई पोलीस दलातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. या अधिकाऱ्याच्या चौकशीची परवानगी मिळवण्यासाठी NIA ने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे विचारणा केली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर ‘एनआयए’चे प्रमुख या अधिकाऱ्याची चौकशी करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

कोण आहेत विक्रम खलाटे :-

Advertisement
  • सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर अधिकारी विक्रम खलाटे रविवारी सकाळी मुंबईतील NIA च्या कार्यालयात पोहोचले.
  • विक्रम खलाटे हे 2008-09 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.
  • बारामती तालुक्यातील लाटे हे त्यांचं मूळ गाव आहे.
  • गेल्या 13 वर्षांपासून ते पोलीस सेवेत कार्यरत असून त्यांना आतापर्यंत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दोनवेळा गौरवण्यात आले आहे.
  • सध्या ते एनआयएचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply