Take a fresh look at your lifestyle.

डिजिटल सातबारा असा मिळवा घरबसल्या; या आहेत सध्या-सोप्या टीप्स्

सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात वारंवार खेटा माराव्या लागतात, तलाठी भेटत नाही, आज या – उद्या या अशी उत्तर मिळतात.. तर नो टेन्शन.. या सोप्या टीप्स वाचा आणि घरबसल्या डिजिटल सातबारा मिळवा.

Advertisement

हा डिजिटल सातबारा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, कर्जप्रकरणांसाठी तुम्ही बिनधास्त वापरु शकता. तसा निर्णयच महसूल विभागाने घेतला आहे. पण हा डिजिटल सातबारा कसा काढायचा हे अनेकांना माहिती नाही. म्हणून हा डिजिटल सातबारा कसा काढायचा, हे आपण जाणून घेऊ..

Advertisement

सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्ही मोबाईलवरुन किंवा लॅपटॉप, संगणकावरुन तुम्हाला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करा.

Advertisement

हे सर्च झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट दिसेल. त्यावर क्लिक करुन ही वेबसाईट ओपन होईल.

Advertisement

त्या वेबसाईटवर उजवीकडे Digitally Signed 7/12 किंवा ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ असा पर्याय दिसेल.

Advertisement

त्यावर क्लिक केल्यास ‘आपला 7/12’ नावाचं एक नवीन पेज ओपन होईल.

Advertisement

त्यावर लॉगीनचे दोन पर्याय दिसतील. लॉग-इन पर्यायावर क्लिक केल्यास तुम्ही जर  आधीच या वेबसाईटवर नोंदणी केलेले असेल तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही सातबारा काढण्यासह अन्य सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. 

Advertisement

पण, जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी वेबसाईटवर आला असाल तर मोबाईल क्रमांक टाकूनही सातबारा काढता येतो. त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Enter Mobile Number या पर्यायाच्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Send OTP या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर OTP sent on your mobile असा मेसेज तिथं दिसेल. तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP म्हणजेच One Time Password असलेला मॅसेज आलेला असेल. या मॅसेजमधील ओटीपी क्रमांक Enter OTP च्या खालच्या रकान्यात टाका. 

Advertisement

त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करा. लगेच तुमच्यासमोर आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतात. यातल्या Digitally signed 7/12 या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा’ असं नवीन पेज ओपन होईल. यामध्ये खाली एक सूचना आहे की, 

Advertisement

“Rs.15 will be charged for download of every satbara. This amount will be deducted from available balance.”

Advertisement

याचा अर्थ सातबारा उताऱ्यासाठी 15 रुपये आकारले जातील, ते तुमच्या बॅलन्समधून कापले जातील.

Advertisement

आपण मोबाईल क्रमांक टाकून सातबारा काढीत असल्यामुळे व आपण नवीन युजर्स असल्यामुळे आपल्या खात्यात बॅलन्स नसतो. त्यासाठी तुम्हाला  खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर पैसे जमा करण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीप ॲप असे वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यातील तुम्हाला योग्य असेल तो पर्याय वापरुन तुम्ही पैसे जमा करा. त्यानंतर तुम्ही पुन्हा डिजिटल सातबारा या पेजवर गेले की तिथं तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं दिसेल. आता तुम्हाला डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी फॉर्मवर दिलेली माहिती भरा.

Advertisement

 त्यात जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडा. त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर टाका. सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी डाऊनलोड करा. त्यानंतर डाऊनलोड झालेला सातबारा स्क्रीनवर ओपन होईल. या सातबारा उताऱ्यावर सुचना लिहिलेली असते की, हा सातबारा डिजटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही. हा सातबारा तुम्हाला सर्व सरकारी योजनांच्या लाभासाठी, बँकिंग प्रकरणांसाठी वापरता येणार आहे. 

Advertisement

संपादन : संतोष वाघ   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply