सोलापूर :
राज्यात महाविकास आघाडी हे तीन घटक पक्षांची राजकीय आघाडी सत्तासोपान चढल्यानंतर आता पहिली मोठी निवडणूक होत आहे. ती म्हणजे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक. या निवडणुकीचा निकाल पुढील वर्षी होणाऱ्या (जानेवारी-फेब्रुवारी २०२२) महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची दिशा खऱ्या अर्थाने स्पष्ट करणार आहे.
मतदार संघाचे दिवंगत लोकप्रिय आमदार भारत नाना भालके यांच्या निधनाने ही जागा खाली झालेली आहे. राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे इथे राष्ट्रवादी विरुध्द भाजप अशी दुरंगी किंवा प्रसंगी एखाद्या अपक्ष उमेदवारासह तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोटनिवडनुकीत अनेक नावे चर्चेत आहेत. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनाच राष्ट्रवादी तिकीट देईल असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, भगीरथ भालके यांचे वय आणि अनुभव लक्षात घेता इतरांनाही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.
भगीरथ भालके यांना आव्हान देण्याची तयारी दामाजी सहकारी साखर करखान्याचे चेअरमन व आवताडे समुहाचे सर्वेसर्वा समाधान आवताडे, युटोपीय साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, शिवसेना महिला नेत्या शैला ताई गोडसे, डी.व्ही.पी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांनीही केली आहे.
राष्ट्रवादी कोणाला तिकीट देते यावरच भाजपचा उमेदवार ठरण्याची चिन्हे आहेत. भालके यांनी नुकतीच काढलेली ‘जनसंवाद यात्रा’ तर, समाधान आवतडे यांनी काढलेली ‘सुसंवाद यात्रा’ काढून आपण रिंगणात असणार असा संदेश दिला आहे. तर, इतरांनी थेट जगजाहीर नाही, मात्र आपापल्या पद्धतीने चाचपणी आणि तयारी करून ठेवली आहे.
ही पोटनिवडणूक खिशात घालून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची तयारी भाजपची आहे. तर, काही मुद्द्यांवर राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात पसरत असेलेली नाराजी रोखून धरण्यासाठी महाविकास आघाडीला ही पोटनिवडणूक महत्वाची वाटत आहे. मतदार कोणाला कौल देतात ते २ मार्च २०२१ च्या निकालानंतर स्पष्ट होईल.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- इन्शुरन्स विकत घेताना घ्या काळजी; नाहीतर भविष्यात बसू शकतो ‘तसा’ही भुर्दंड..!
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष