Take a fresh look at your lifestyle.

किरीट सोमय्यांनी केली शरद पवारांना ‘ही’ मोठी मागणी; वाचा, नेमकी का आणि कशामुळे केली मागणी

मुंबई :

Advertisement

राज्यात सध्या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरण गाजत आहे. यामुळे देशपातळीवर खळबळ उडाली आहे. 

Advertisement

अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावं, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Advertisement

तू अंगावर आरोप घे, मग मी तुला जामिनावर सोडतो, असं वाझे यांनी हिरेन यांना सांगितलं होतं. या प्रकरणात हिरेन यांना अडकवण्याची वाझेंची आयडिया होती, असं सांगतानाच या सर्व प्रकरणाच्या मागे हिरेन असल्याचं पोलिसांना भासवायचं होतं. पण हिरेन यांनी ते मान्य केलं नाही. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलीस सर्व पुरावे नष्ट करत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.  

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply