Take a fresh look at your lifestyle.

ग्रामरोजगार सेवकांना मिळणार ‘इतके’ मानधन; रोहयोला गती देण्यासाठी महत्वाचा निर्णय

अहमदनगर :

Advertisement

ग्रामरोजगार सेवक हा रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमधील महत्वाचा घटक. मात्र, त्यांना सरकारकडून कोणतेही ठोस मानधन देण्यात येत नसल्याने अनेकांनी या कामाकडे विशेष लक्ष देणे बंद केले होते. त्यामुळेच आता सरकारने त्यांना मानधनाचे कोष्टक मंजूर करून दिले आहे.

Advertisement

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनंेतर्गत गावातील ग्रामरोजगार सेवकांचे एकूण वार्षिक मनुष्य दिवसानुसार मानधन निश्चित करण्यात आलेले आहे. यानुसार २ हजार ते ६ हजार ४०० रुपयांपर्यंत मानधन निश्चित करण्यात आले आहे. या गणनेत टक्केवारी काढताना एकूण कामाच्या ६ टक्के काढण्यात आली अाहे.

Advertisement

योजनंेतर्गत मजुरी प्रदानाच्या खर्चाच्या ०.७५ वरुन २.२५ टक्यांपर्यंत वाढवण्यात आले होते. त्यामुळे कामाचे प्रमाण जास्त असणाऱ्या ग्रामपंचायतीत त्यांना समाधानकारक मानधन मिळत होते; परंतु कमी मनुष्य दिवस निर्मिती किंवा पुरेशी कामे नसणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये त्यांना पुरेसे मानधन मिळत नव्हते. हीच असमानता लक्षात घेऊन महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत.

Advertisement

ग्राम रोजगार सेवकांना प्रत्यक्ष प्रवास खर्च व अल्पोपहार खर्च देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यात त्यांना मनरेगाच्या कामानिमित्त प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बस, रेल्वेचा द्वितीय वर्ग व रिक्षामधून प्रवास खर्च मिळणार आहे.

Advertisement

मानधनाचे मुद्दे असे :

Advertisement
  •  ७५१ ते १५०० पर्यंत मनुष्य दिवसांसाठी २ हजार रुपये
  • १५०१ ते २५०० पर्यंत मनुष्य दिवसांसाठी ३ हजार रुपये
  • २५०१ ते ४००० पर्यंत मनुष्य दिवसांसाठी ३ हजार ५०० रुपये
  • ४००१ ते ५५०० पर्यंत मनुष्य दिवसांसाठी ४ हजार रुपये
  • ५५०१ ते ७००० पर्यंत मनुष्य दिवसांसाठी ४ हजार ५०० रुपये
  • ७००१ ते ८००० पर्यंत मनुष्य दिवसांसाठी ५ हजार रुपये
  • ८००१ ते ९००० पर्यंत मनुष्य दिवसांसाठी ५ हजार ७०० रुपये
  • ९००१ ते १००० मनुष्य दिवसांसाठी ६ हजार ४०० रुपये

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply