Take a fresh look at your lifestyle.

‘या’ दिग्गज कॉंग्रेस नेत्यालाही झटका; ईडीने जप्त केली मुलीची मालमत्ता

मुंबई :

Advertisement

सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर अस्थिर वातावरण आहे. सध्याच्या सत्ताधारी नेत्यांना विरोधी पक्ष काम करू देत नाही, अशा चर्चा आता लोकसुद्धा करू लागले आहेत.

Advertisement

महाराष्ट्रात कधीही काहीही घडलं तरीही केंद्रीय यंत्रणा नेहमीच त्यात हस्तक्षेप करत असल्याची टीकाही सत्ताधारी नेत्यांकडून होत असते. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता जप्त केली आहे. शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची मालमत्ता ईडीकडून दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली मालमत्ता ही अंधेरीतील कालेडोनिया इमारतीमधील आहे.

Advertisement

मनी लॉन्ड्रिंग कायद्यांर्तग (पीएमएलए) कारवाई केलेल्या मालमत्तांमध्ये अंधेरी (पूर्व), मुंबई येथील कॅलेडोनिया बिल्डिंगमधील 10,550 चौरस फूट दोन व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी प्रीती श्रॉफ यांच्या मालकीची 35.48 कोटींची मालमत्ता आहे. प्रीती श्रॉफ कॉंग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे, अशी माहिती ईडीकडून देण्यात आलेली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply