दिल्ली :
निवडणुकीत आपल्याला कोणताही उमेदवार आवडत नसल्यास किंवा महत्वाचे म्हणजे लायकवान वाटत नसल्यास नोटा हे बटन दाबून मतदान करण्याची सोय आहे. मात्र, या ‘नोटा’ला मतदान झाल्याची कोणतीही ठोस दखल घेण्याची कार्यवाही होत नसल्याने जनता त्याकडे अनुत्सुक असते. हेच ओळखून नोटा बटनाला किंमत देण्यासाठी सर्वोच्च न्यायालायात याचिका दाखल झाली आहे.
एखाद्या मतदारसंघात ‘नोटा’ला (नन आॅफ द अबव्ह) सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळाली तर त्या मतदारसंघातील निवडणूक रद्द केली जावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. वकील अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यावर सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे.
मतदारसंघातील कुठलाही उमेदवार निवडून देण्याच्या पात्रतेचा वाटला नसेल तर मतदार ‘नोटा’चा पर्याय निवडू शकतात. गेल्या काही निवडणुकांत लोक या पर्यायाचा बराच वापर करत आहेत. मात्र, या बटनावर जास्त मतदान झाल्यास काय? निवडणूक तर रद्द होत नाही ना? हाच प्रश्न नकारात्मक उत्तराचा असल्याने हे बटन फ़क़्त शोभेचे झालेले आहे.
याकडेच लक्ष वेधण्याचे काम आताच्या याचिकेद्वारे झाले आहे. एखाद्या मतदारसंघात ‘नोटा’ला सर्वाधिक मते मिळाली तर तेथे नव्याने निवडणूक घ्यावी. त्याचबरोबर तेथील उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळू नये, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे.
ही मागणी मान्य केली तर अनेक मतदारसंघांत कोणाचेही प्रतिनिधित्व राहणार नाही. अशी स्थितीत सभागृह काम कसे करणार? आम्ही तुमच्या याचिकेवर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत आहोत. त्यांचे शपथपत्र पाहिल्यानंतर न्यायालय या प्रकरणावर पुढे विचार करेल, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी म्हटले आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- अहमदनगर सर्वेक्षण : ‘झेडपी’बाबत नागरिकांचे आहे ‘हे’ मत; पंचायत समितीबाबत म्हटले जातेय ‘असे’..!
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!
- म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम
- रोहित पवार ब्लॉग : याबाबत निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा…; पहा काय आवाहन केलेय त्यांनी