Take a fresh look at your lifestyle.

18 ते 21 मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे संकट; वाचा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कधी होणार पाऊस

मुंबई :

Advertisement

सध्या कधी ढगाळ तर कधी कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. या वातावरणाचा फटका द्राक्षसारख्या पिकाला आधीच बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता सांगितली गेली आहे.

Advertisement

महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात 18-21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याआधीच आपला शेतमाल जपून ठेवावा अश्याही सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Advertisement

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे मघे गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात गारपीटीची शक्यता असल्याचे हवामाना विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advertisement

18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये मेघ गरजेनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मेघ गरजेनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. नागपुर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा आणि गारपिटीचा प्रभाव असेल असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply