Take a fresh look at your lifestyle.

भारताचा स्टार गोलंदाज बुमराह झाला क्लिन बोल्ड; अडकला विवाह बंधनात

भारताचा स्टार गोलंदाज बुमराह सोमवारी विवाह बंधनात अडकला. ॲकर संजना गणेशनसोबत तो विवाहबध्द झाला असून शीख पध्दतीने दोघांचा विवाह सोहळा पार पडला. बुमराह आणि संजनाला शुभेच्छा देताना भारताच्या एका खेळाडूकडून चांगलीच मोठी चुक झाली असून त्यामुळे सध्या त्याला ट्रोल केले जात आहे.

Advertisement

मयंक अग्रवाल याने लग्नासाठी बुमराहचे अभिनंदन करताना संजना गणेशनच्याऐवजी संजय बांगर यांना टॅग केले. जेव्हा मयंक अग्रवाल याला आपली चूक लक्षात आली तेव्हा त्याने आपले ट्विट हटवले पण त्याआधी अनेक चाहत्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घेतला होता आणि मयंकला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. मयंक अग्रवाल याने ट्विट केले होते की, ‘मुबारक हो जसप्रीत बुमराह आणि संजय बांगर. तुम्हा दोघांनाही सुखी आयुष्य लाभो, निरोगी राहा.

Advertisement

दरम्यान, बुमराहने गोव्यातील क्रीडा अँकर संजना गणेशनशी लग्न केले आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली, केएल राहुल यांच्यासह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. जसप्रीत बुमराहनेही सोशल मीडियावर लिहिले आहे आणि चाहत्यांसोबत आपला आनंद व्यक्त केला की आता त्याचा नवीन डाव सुरू झाला आहे. जसप्रीत बुमराहने लग्नाचा फोटो पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

Advertisement

बुमराहने लग्नासाठी सुट्टी घेतली. तो इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळला नाही. यानंतर टी -२० मालिकेतही त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही त्याला विश्रांती देण्यात येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply