Take a fresh look at your lifestyle.

आयपीएलची नवी जाहीरात चर्चेत : कसा आहे माहीचा लुक आणि कोण म्हणाले त्याला ‘थलाई लामा’

जेव्हा विषय भारताचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीचा येतो, तेव्हा चर्चा तर होतेच. मग तो क्रिकेटच्या मैदानावर असो वा नसो, तो चर्चेत मात्र नेहमीच असतो. गेल्या दोन दिवसांपासून धोनी आपल्या बौद्ध भिक्खू अवतारामुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. चाहत्यांना माहीचा नवीन लूक चांगलाच भावला आहे.

आयपीएलचे अधिकृत ब्रॉडकास्टर असलेल्या स्टार स्पोर्ट्सने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी याचे चित्र ट्विटरवर शेअर केले आहे. सुरुवातीला हे छायाचित्र कशासाठी आहे हे कोणालाही समजले नाही. परंतु त्यानंतर जेव्हा स्टार स्पोर्ट्सने एक जाहिरात प्रसिद्ध केली तेव्हा समजले की धोनीचा हा नवा लूक आयपीएलच्या १४ व्या मोसमातील प्रमोशनचा एक भाग आहे.

माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफरनेही या लूकबद्दल मजेदार कमेंट केली आहे. खरं तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी -२० दरम्यान विस्डेनने धोनीच्या बौद्ध भिक्षूच्या लूकचा एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन देण्यास सांगितलं. यावर जाफरने असे कॅप्शन दिले की सोशल मीडिया वापरणारेसुद्धा त्यांचा हशा रोखू शकले नाहीत.

जाफरने धोनीच्या या चित्राची तुलना बौद्ध गुरू दलाई लामा यांच्याशी केली आणि लिहिले ‘थलाई लामा’. धोनी चेन्नईसाठी आयपीएल खेळतो आणि तिथले लोक प्रेमाने त्याला थलाईवा (नेता) म्हणतात. ३९ वर्षीय धोनी आयपीएलच्या १४ व्या सत्रात पुन्हा मैदानात परतला आहे. त्याने चेन्नईमध्ये सरावही सुरू केला आहे. तीन दिवसांपूर्वी सीएसकेच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, त्यामध्ये धोनी लांब षटकार मारताना दिसत होता.

आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये पोहचू शकला नाही. या मोसमात धोनीही अयशस्वी ठरला. धोनीने १४ सामन्यांत २५ च्या सरासरीने २०० धावा केल्या. आयपीएलमध्ये धोनीने १३६ च्या स्ट्राइक रेटने ४ हजार ६३२ धावा केल्या आहेत. यात २३ अर्धशतकांचा समावेश आहे. सीएसके यावर्षी आयपीएलचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटलविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply