Take a fresh look at your lifestyle.

वाझे प्रकरणावर राणेंनी टाकला ‘हा’ प्रकाश; आता IPL सट्टेबाजांचीही एन्ट्री..?

मुंबई :

Advertisement

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे प्रकरण वेगळे वळण घेऊन दररोज अवघ्या देशाला धक्का देत आहे. आता वाझे यांच्या प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

अँटीलिया स्फोटके, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणावर राणे यांनी म्हटले आहे की, वाझेंनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून दीडशे कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणाचीही एनआयएने चौकशी करावी.

Advertisement

भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत राणे म्हणाले की, आयपीएलचे सामने खेळवले जातात. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवर सट्टा लावला जातो. त्या सट्टेबाजांना वाझेंकडून फोन जात होता. ला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती.

Advertisement

आरोप करताना राणे यांनी पुढे म्हटले आहे की, तुमचे लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून दिली जात असे. वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना पैशांच्या हिस्स्यासाठी एका माणसाचा फोन जातो. हा माणूस म्हणजे, वरुण सरदेसाई आहे.

Advertisement

वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा. रदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही, असेही पुढे राणे यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply