Take a fresh look at your lifestyle.

कांदा पीकसंरक्षण : वाचा, कारण किडरोगाच्या नियंत्रणासाठी उपयोगी ठरेल ‘हा’ कृषीसल्ला

कांदा पिकामध्ये वाढता उत्पादन-खर्च हे मोठे आव्हान बनले आहे. बाजारातील चढउतार लक्षात घेता शेतकऱ्यांना आता याच उत्पादन-खर्चावर नियंत्रण आणून काटेकोर पिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी  चितेगाव (ता. निफाड, जि. नाशिक) राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राच्या वतीने पिकसल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आलेले आहे.

Advertisement

केंद्राचे पानरोग तांत्रिक अधिकारी मनोज कुमार पांडे, सहायक संचालक डॉ. आर. सी.गुप्ता, कीटकशास्त्र विभागाचे डॉ. सुजय पांडे, फलोत्पादन विभागाचे डॉ. सत्येंद्र सिंह यांनी कांदा पीकसंरक्षण याबाबत सुचवलेल्या उयायोजना पुढीलप्रमाणे :

Advertisement

वाढत्या तापमानामुळे कांदा पिकावर स्टेमफिलियम झुलसा व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने कांदा पीक धोक्यात आले आहे. कीड व रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कांदा लागवड करण्यापूर्वी सात ते दहा दिवस अगोदर लागवड क्षेत्राच्या चारही बाजूंनी चार ओळी मका, चार ओळी गव्हाची पेरणी करावी.

Advertisement

वरील उपाय करून रसशोषक किडीसह रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच कांदा पीक ३० दिवसांचे असताना एक लिटर पाण्यात मॅकोझेब २.५ ग्रॅम, फित्रोनिल १ मिलि, स्टिकर अर्धा मिलि या द्रावणाची दहा दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

Advertisement

वाढत्या तापमानामुळे कांदा पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी कांद्याची लागवड करण्यापूर्वी मका व गव्हाच्या प्रत्येकी चार ओळी लागवड क्षेत्राच्या चारही बाजूने केल्यास कीड व रोगावर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध करता येतो. 

Advertisement

ता.क. : अधिक माहितीसाठी राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्र ०२५५०- २३७८१६ क्रमांकावर संपर्क करावा.

Advertisement

संपादन : संतोष वाघ    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply