Take a fresh look at your lifestyle.

बँकापाठोपाठ ‘त्या’ चार दिग्गज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला मोदींच्या सरकारविरोधात एल्गार..!

पुणे :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात निर्गुंतवणूक आणि खासगीकरण याला अभूतपूर्व अशी गती आली आहे. याच काळात अनेक दिग्गज असलेल्या कंपन्या डबघाईला येण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आता बँका आणि विमा कंपन्या यांचे खासगीकरण जोरावर आलेले आहे. त्याविरुद्ध कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

Advertisement

डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने एक अध्यादेश काढत विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढविली आहे. अध्यादेशाला कायद्याचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता देशातील जनरल इन्शुरन्स अाणि एलअायसीचे कर्मचारी यांनी यास आपला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धाेरणाला कडाकडून विराेध करण्यासाठी देश पातळीवरील बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची नऊ संघटनांनी साेमवार व मंगळवार असे दाेन दिवस संपावर जात आहेत. त्यात आता विमा कंपन्यांनीही आपला विरोध दाखवण्यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धाेरणाविरोधात १७ मार्चला (बुधवारी) नॅशनल इन्श्युरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, अाेरिएन्टल इन्शुरन्स अाणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या चार जनरल इन्शुरन्स कंपन्यांचे तर १८ मार्च (गुरुवारी) एलअायसीचे कर्मचारी संपावर जाणार अाहेत. 

Advertisement

दरम्यान, संयुक्त किसान माेर्चा व केंद्रीय कामगार संघटनांचा या संपाला पाठिंबा असून संयुक्त निर्णयानुसार या तीनही संपाला पाठिंबा जाहीर करण्यात अाला अाहे. अाज १५ मार्च हा दिवस खासगीकरण विराेधी दिन म्हणून पाळला  जात आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply