Take a fresh look at your lifestyle.

गोष्ट यशाची : ‘अंबिकां’च्या एकजुटीची कमाल; बचत गटाची पुण्या-मुंबईत धमाल..!

महिलांना योग्य संधी मिळाली आणि त्यांना त्यातून मार्ग शोधण्यासाठी मदत मिळाली तर त्या अवघ्या जगाला दिपवणारे काम करू शकतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. तसेच एक उद्योग क्षेत्रातील उदाहरण माळशिरसच्या पिराळे गावातील महिला श्री अंबिका बचत गटाच्या महिलांनी जगासमोर ठेवले आहे.

Advertisement

तीन वर्षांपूर्वी श्री अंबिका बचत गटाच्या नावाने या महिलांनी बचत गट या समूहाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सविता माने, ताई झेंडे, कोमल मसुगडे, सुरेखा मसुगडे , चांगुणा किर्द, सविता किर्द , रूपाली पवार, लक्ष्मी बुधावले मनीषा झेंडे, कौशल्या बुधावले, कोमल झेंडे, पद्मिनी पाटोळे या महिलांनी हा ग्रुप बांधला आणि एक वेगळ्या मार्गावर त्यांची सुरुवात झाली.

Advertisement

मार्केटची गरज आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला कच्चा माल यांची सांगड घालून त्यांनी मसाल्यांचे पदार्थ, चिक्की, काकवी आणि सेंद्रिय गूळ या पदार्थांची निर्मिती सुरू केली. क्वालिटी महत्वाची असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी काम सुरू ठेवल्याने ग्राहकांना त्यांच्या पदार्थांची गोडी लागली.

Advertisement

आता सोलापूर जिल्ह्यासह बारामती, नाशिक, नगर, मुंबई, पुणे आणि बंगळुरू या शहरात त्यांच्या उत्पादनांची विक्री होत आहे. चत गटाच्या अध्यक्षा सविता माने यांनी याबाबत सांगितले की, आयुर्वेदात काकवीला म्हणजेच विशिष्ट तापमानावर उसाच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या पाकाला अधिक महत्त्व आहे. भूक लागत नसल्यास किंवा अशक्तपणा असल्यास काकवी उपयोगी ठरते.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply