अहमदनगर :
भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये पुन्हा एकदा चकमकीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. डॉ. विखे यांनीच जामखेड येथील एका कार्यक्रमातून याला सुरुवात केली आहे.
डॉ. विखे यांनी कोणाचेही नाव न घेता टीका केली आहे. मात्र, स्थानिक आमदारावर टीका म्हटल्यावर त्यांचा रोख थेट आमदार रोहित पवार यांच्यावर असल्याचे सर्वांनाच लक्षात आलेले आहे. त्यामुळे आता डॉ. विखे यांच्या टीकेला पवार काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. विखे म्हणाले की, राज्यातील सर्व खासदारांपेक्षा जास्त निधी केंद्र सरकारकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मिळाला आहे. हा निधी मीच आणला असूनही प्रसिद्धीचा हव्यास अजिबात केला नाही. मात्र, ‘येथील आमदार’ सांगत आहेत की, हा निधी मीच आणला. सोशल मीडियावर ते असे सांगत आहेत. जे काम त्यांनी केले नाही, निधी आणलेला नाही, त्याचे श्रेय त्यांनी अजिबात घेऊ नये. त्यामुळेच मी आता जनतेत जाऊन कोणकोणता निधी आणला हे सांगणार आहे.
खासदार डॉ. विखे आणि आमदार पवार यांच्याकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समझोत एक्स्प्रेस झाल्याचे म्हटले जात असतानाच कर्जत तालुक्यातील जागा विखे गटाने सहजपणे खिशात टाकली. त्यामुळे पवारांना मोठा धक्का बसला आहे. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत विखे विरुद्ध पवार गटात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय