Take a fresh look at your lifestyle.

म्हणून देशावर अर्थसंकट; पहा करोना पॅकेजची डॉ. मुणगेकरांनी कशी केली पोलखोल

अहमदनगर :

Advertisement

देशभरात सध्या आर्थिक अरीष्ट्य घोंगावत आहे. बेरोजगारी वाढत असतानाच त्यावर ठोस कार्यवाही केली जात नसल्याने उद्योग-व्यवसाय आणखी अडचणीत येत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे करोना पॅकेजही निष्प्रभ ठरल्याची टीका अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.

Advertisement

भाऊसाहेब थोरात साखर कारखाना विश्राम गृहावर पत्रकारांशी बोलताना देशाच्या आर्थिक गोष्टीबाबत डॉ. मुणगेकरांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे उपस्थित होते.

Advertisement

डॉ. मुणगेकर म्हणाले की, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० % पॅकेज देशाला सावरण्यासाठी जाहीर करण्याची आवश्यकता होती. मोदी सरकाने त्याकडे दुर्लक्ष केले. २० लाख कोटीचे अचानक पॅकेज जाहीर करतानाच तपशील लपवला. नंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खुलासा करतानाही फक्त १ लाख ७८ कोटीच्या पॅकेजचे आकडेच मांडले

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले की, पॅकेजमधील १७-१८ लाख कोटी चक्क बँकेच्या माध्यमातून कर्जाच्या रूपाने दिले जाणार होते. तर, बँकांकडे थकीत कर्ज ९-१० लाख कोटी असल्याने कर्ज मिळण्याची शक्यताच नव्हती. यामुळे मोदींचे पॅकेज ही निरर्थक घोषणा ठरली.

Advertisement

मोदी सरकारच्या धोरणात्मक चुकांमुळे देशात बेरोजगारी वाढली असूनही सरकारची याबाबतची स्पष्ट भूमिका आणि धोरण नाही. सूक्ष, लघू व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नसल्याने बेरोजगारी वाढत असल्याचा आरोप डॉ. मुणगेकर यांनी केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply