अहमदनगर :
राज्यासह नगरमधील जनतेसाठी चिंतेची बाब समोर येतेय. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा उसळी घेतोय. तसेच नगरमध्येही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी राज्य सरकारचे नियम गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झालीय.
नगरमध्ये करोना बाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ आजही कायम आहे. जिल्ह्यात आज पुन्हा 449 नवे पॉझिटिव्ह सापडले असून, आज केवळ 325 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 77 हजार 30 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.77 टक्के इतके झाले आहे. आज वाढलेल्या नव्या रुग्णांमुळे झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 227 इतकी झाली आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 94, अकोले 05, कोपरगाव 28, नगर ग्रामीण 08, नेवासा 09, पारनेर 10, पाथर्डी 04, राहाता 42, राहुरी 09, संगमनेर 32, शेवगाव 08, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 13 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 23 जण बाधित आढळुन आले. मनपा 10, पारनेर 01, पाथर्डी 01, राहाता 05, शेवगाव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 01, कॅन्टोन्मेंट 01, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!
- म्हणून शेअर बाजारात तेजी; पहा सेन्सेक्स, निफ्टीची काय स्थिती
- अहमदनगर सर्वेक्षण : ‘झेडपी’बाबत नागरिकांचे आहे ‘हे’ मत; पंचायत समितीबाबत म्हटले जातेय ‘असे’..!