Take a fresh look at your lifestyle.

चीनचा खोटारडेपणा उघड; पहा करोनाप्रकरणी कसे फसवले होते त्यांनी

चीन हा देश म्हणजे पोलादी भिंतीच्या पलीकडे नेमके काय चालू आहे याचा थांगपत्ता लागू न देणारा देश. हा कुरापतखोर देश करोना विषाणूच्या संकटामुळे सध्या सर्वांच्या संशयाखाली आहे. मात्र, त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेची फसवणूक करून क्लीनचीट मिळवली की काय, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

करोना विषाणू चीनमधून जगभरात पसरला नसल्याचाचीनचा दावा आहे. हा विषाणू नेमका कुठून आला याबाबत अनेक दावे-प्रतिदावे आहेत. त्याचवेळी कोरोना विषाणूने जगभरात लाखो लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना विषाणू चीनच्या वुहान लॅबमधून बाहेर आला असा जगाने चीनवर आरोप केला जात आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने एक पथक पाठवून याची खात्री केल्यावर त्यांनी चीनला याप्रकरणी क्लीनचिट दिली होती. मात्र, डब्ल्यूएचओने क्लीनचिट दिल्यानंतर आता कोरोना विषाणूचा वुहानच्या प्रयोगशाळेतून विस्फोट झाल्याचा पुरावा सापडला आहे. कारण कोरोनाची पहिली घटना समोर आल्याच्या एका वर्षापूर्वीच चीनने वटवाघुळे पकडल्याचे एका अहवालात समोर आले आहे.

Advertisement

मग प्रश्न असा निर्माण होत आहे की, वटवाघुळे हे करोनाचे संक्रामक नव्हते तर मग चीनचे संशोधक एक वर्षापूर्वीच वटवाघुळे का पकडत होते? एका वृत्तवाहिनीनुसार, चीनच्या वुहान लॅबने 11 महिन्यांपूर्वी वटवाघुळे ठेवण्यासाठी पिंजऱ्याचे पेटंट मिळवले होते. या प्रयोगशाळेने 2018 मध्येच अशा पिंजऱ्याच्या पेटंटसाठी अर्ज केला होता.

Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी प्रयोगशाळे वटवाघुळे पकडत असत आणि गुहेमध्ये त्यांना पिंजऱ्यात ठेवले जाई. त्यांना खायला घालून त्यांचे संवर्धन करण्याचे काम तिथे करत असत. या प्रयोगशाळेत वटवाघुळे कृत्रिमरित्या वाढवले जात. दरम्यान, त्यांना खायला घालताना मानवांमध्ये हा विषाणू पसरल्याची शंका अनेकांना आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply