दिल्ली :
बंदी घातलेल्या खालिस्तान समर्थक दहशतवादी समर्थक गटाच्या शीख फॉर जस्टिस या गटाबद्दल मोठा खुलासा झाला आहे. या संघटनेने थेट संयुक्त राष्ट्रसंघाला (यूएन) 10 हजार डॉलर्स इतकी देणगी दिली आहे.
असे म्हटले जात आहे की, ही खलिस्तानी संघटना संयुक्त राष्ट्र संघटनेवर दबाव आणत आहे. शेतकरी चळवळीदरम्यान झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक कमिशन स्थापन करण्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न ही संघटना करीत आहे.
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त यांच्या प्रवक्त्याने शीख फॉर जस्टिसच्या देणगीच्या बातमीची खात्री केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्राने शीख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन कडून 10,000 डॉलर्स किंवा सुमारे सात लाख रुपये देणगी घेतली आहे. हा गट भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या गैरवर्तनाची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघावर ‘कमिशन ऑफ इन्क्वायरी’ तयार करण्यासाठी दबाव आणत आहे.
अमेरिकेतील शीख फॉर जस्टिसचे सरचिटणीस गुरपतवंत सिंग पन्नुन यांनी निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्राच्या वतीने चौकशी कमिशन स्थापन करण्यासाठी शीख समुदायाने 13 लाख डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले आहे. हा आयोग भारताच्यावतीने शेतकर्यांवर देशद्रोह आणि हिंसाचाराच्या आरोपाची चौकशी करणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, 1 मार्च रोजी आम्हाला शीख फॉर जस्टिसच्या लोकांकडून 10,000 डॉलर्स ऑनलाईन देणगी मिळाली आहे. सहसा संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातल्याखेरीज त्या लोकांचे किंवा संस्थांचे दान आम्ही नाकारत नाही.
प्रवक्त्याने पुढे म्हटले आहे की, भारताविरुद्ध अशा प्रकारच्या चौकशी आयोगाच्या कोणत्याही कमिशनची योजना नाही. शीख फॉर जस्टिसला यासंदर्भात कळविण्यात आले आहे आणि जर त्यांचा काही गैरसमज असेल तर देणगी परत करू शकतो.
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय