Take a fresh look at your lifestyle.

भाजपला फ़क़्त ‘तिथेच’ मिळणार यश; विधानसभा निवडणुकीबाबत पवारांनी मांडला अंदाज

पुणे :

Advertisement

बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय मुद्द्यावर भूमिका मांडली आहे. त्यांनी फ़क़्त एकट्या आसाम राज्यात पुन्हा भाजप सत्तेत येण्याची शक्यता असून इतर ठिकाणी भाजपला खूप कमी प्रमाणात यश मिळेल असे सुतोवाच केले आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, निवडणूकांबाबत आज बोलणे अवघड आहे, पण जनता योग्य निर्णय घेत असते. आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. तिथे त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. मात्र, इतरत्र त्यांना यश मिळण्याची तितकी शक्यता नाही.

Advertisement

तमिळनाडूतील जनतेचा कौल स्टॅलिन व डीएमके यांच्या बाजूने असेल, तर केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता ही एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करत असल्याने जनता त्यांनाच पुन्हा सत्तेमध्ये संधी देईल अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply