Take a fresh look at your lifestyle.

वाझेप्रकरणी भाजप आक्रमक; पहा नेमके कोणते मुद्दे उपस्थित केलेत त्यांनी

मुंबई :

Advertisement

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात चर्चेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपने याप्रकरणी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Advertisement

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी म्हटले आहे की, पुराव्यांच्या आधारे कोर्ट निर्णय घेत असते, जर  कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला असेल तर त्यामागे काही तरी सत्यता आहे. आता तरी सरकारने यातून जागं व्हायला पाहिजे. वाझे हे यापूर्वी गुप्तवार्ता विभागात असताना त्यांनी धाडसी वृत्तीने चांगल्या कामगिरीही केली आहेत. वाझे सर्व बाजूने अडचणीत आल्यामुळे कदाचित व्यथित होऊन, निराशेपोटी त्यांनी स्टेट्स ठेवले असावे.

Advertisement

तर, अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी जाताना सचिन वाझे यांनी मनसुख यांची स्कॉर्पिओ घेऊन गेले होते ही माहीती धक्कादायक आहे? पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कार्यकाळात पोलीस दलाची किती वाताहत झाली हे उघड करणारी ही बाब आहे.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी जाताना सचिन वाझे यांनी मनसुख यांची स्कॉर्पिओ घेऊन गेले होते ही माहीती धक्कादायक आहे? पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कार्यकाळात पोलीस दलाची किती वाताहत झाली हे उघड करणारी ही बाब आहे.” / Twitter

Advertisement

राम कदम यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. वाझे हेच केसचे तापसी अधिकारी होते. त्यांनाच वाचवण्यासाठी आता सर्वांना आटापिटा करावा लागत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचे याकडे कदम यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

Ram Kadam – राम कदम on Twitter: “देखो महाराष्ट्र सरकार की नौटंकी जो पुरे षड्यंत्रका प्रमुख आरोपी है वहीं सचिन वाजे पुरे केस का जांच अधिकारी था। यह सबकुछ जानबूझकर था क्योंकि महाराष्ट्र सरकार कुछ बड़े नामों को बचाना चाहती थी ? वहीं कारण था पूरी सरकार एक साधारण अफसर को बचाने के पीछे पडी थी, @AnilDeshmukhNCP जी” / Twitter

Advertisement

तर, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, सचिन वाझेंना अटक आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख व मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी झालीच पाहिजे.

Advertisement

Kirit Somaiya on Twitter: “सचिन वाझेंना अटक. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी झालीच पाहिजे @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis https://t.co/ecn1heP53q” / Twitter

Advertisement

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply