Take a fresh look at your lifestyle.

करोना लस कितपत प्रभावी, असा प्रश्न आहे तर वाचा ही माहिती; दिवसभरात १० वेळा बदलतो विषाणू..!

करोना विषाणूवरील लस आलेल्या आहेत. त्याबद्दल समज-गैरसमज आहेत. त्यामुळे ही लस कितपत प्रभावी असेच प्रश्न सामान्य जनतेला वाटत आहेत. त्याबद्दल प्रश्न असणाऱ्यांनी ही माहिती नक्कीच वाचावी आणि पुढे शेअर करावी.

Advertisement

ही माहिती दिव्य मराठी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवींद्र वानखेडकर यांच्या मुलाखतीतून संपादित आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement

कोरोनाचा विषाणू हा एकाच दिवसात १० वेळा आणि वर्षभरात त्याच्या संरचनेत ४ हजार वेळा बदल झाले आहेत.

Advertisement

त्याचा फैलाव रोखणे शक्य असल्याने जगभरात लस तयार आहेत. इतर काही लस तयार होत आहेत. सध्या सर्व लस प्रायोगिक असल्या तरी खूप उपयुक्त ठरत आहेत.

Advertisement

लसीकरण केल्यावर कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार घडतात. मात्र, लस दिलेल्यामध्ये रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाणही अत्यल्प आहे.

Advertisement

कोणतीही लस प्रभावी होण्यासाठी ३-५ वर्षांचा कालावधी लागतो. सध्या सर्वच लस प्रायोगिक आहेत. त्यांचा फायदा झालाच आहे. याचे १०० टक्के परिणाम अद्याप दिसत नाही. मात्र, लस किती काळ प्रभावी ठरेल याचे फ़क़्त उत्तर काळच देईल.

Advertisement

भारतीय लस या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या असल्याने सर्वाधिक उपयुक्त आहेत. कोव्हॅक्सिन लस तिसऱ्या फेजची होती. त्यामुळे लसीकरण करताना आम्ही ट्रायलमध्ये सहभागी होत आहोत, असा अर्ज भरून घेण्याची गरज नाही.

Advertisement

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply