Take a fresh look at your lifestyle.

भाजपला मोठा धक्का; अटलबिहारी वाजपेयींसोबत केंद्रीय मंत्री राहिलेल्या ‘या’ भाजप नेत्याने घेतली ‘ही’ भूमिका

दिल्ली :

Advertisement

सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे पश्चिम बंगालमध्ये वाहू लागले आहे. सध्या सत्ताधारी पार्टी म्हणून कार्यरत असणार्या तृणमूल काँग्रेसचे अनेक बडे बडे नेते भाजप मध्ये प्रवेश करत आहेत. मोदी-शहांचा कुरघोड्या करणारा रथ रोखण्यास ममता तयारी करत आहेत. अशातच भाजपला एका मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.    

Advertisement

शनिवारी माजी केंद्रीय मंत्री आणि माजी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करीत भाजपला मोठा धक्काच दिला आहे. केंद्रातील मोदी सरकार लोकशाही मूल्ये आणि तत्त्वांची पायमल्ली करीत असल्याने आपल्याला भाजप सोडावा लागल्याचे प्रतिपादन सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करताना केले. 

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या दडपशाहीविरुद्ध छेडलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आपण तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.

Advertisement

कोण आहेत यशवंत सिन्हा आणि कशी आहे त्यांची कारकीर्द :-

Advertisement
  • जेष्ठ राजकारणी आणि केंद्रात अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषवणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी 2018 मध्ये पक्ष नेतृत्वाशी प्रचंड वैचारिक मतभेद झाल्यानंतर भाजप सोडला होता.
  • ते 1990 मध्ये तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर आणि त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते. सिन्हा यांनी केंद्रात अर्थमंत्री पद आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदही भूषवले.

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply