सचिन वाझेंच्या घराला आहे २ आठवड्यांपासून कुलूप; कुटुंबीयांबाबत ‘तो’ धक्कादायक प्रकार समोर
मुंबई :
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार लावल्या प्रकरणी एनआयएने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एन्काऊंटर स्पेशालिस्य सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली असून आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (NIA will arrest three more people after Sachin Vaze’s Arrest.)
अशातच आता वाझे यांच्या कुटुंबाबाबत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वाझे यांचे कुटुंबीय मागील 10 ते 12 दिवसांपासून घरी नसल्याची बाब समोर आली आहे. वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने सदर माहिती ‘टीव्ही 9’ या मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे.
कुठे राहतात वाझे आणि काय आहे हे नवे प्रकरण :-
सचिन वाझे हे ठाण्याच्या साकेत कॉम्प्लेक्स परिसरात बी 6 क्रमांकाच्या इमारतीत वास्तव्याला आहेत. शनिवारी रात्री त्यांना अटक झाली असून यानंतर ‘एनआयए’कडून वाझे यांच्या घराची झडती घेतली जाण्याची शक्यता आहे. वाझे यांचे कुटुंबीय मागील 10 ते 12 दिवसांपासून घरी नसल्याचं सिक्युरिटीने सांगितलं. तसंच त्यांच्या घराला कुलूप आहे, अशी माहिती मिळाली आहे.
अंबानींच्या घराबाहेर लावलेल्या स्कॉर्पिओच्या कटात थेट वाझेंचा सहभाग असल्याचा संशय आल्याने वाझेंना अटक करण्यात आली आहे. या कटात आणखी 5-7 जणांचा समावेश आहे. मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ठाणे येथून आणखी ३ जणांच्या अटकेची शक्यता असल्याचे एनआयएमधील सुत्रांनी सांगितले आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!
- म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम
- रोहित पवार ब्लॉग : याबाबत निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा…; पहा काय आवाहन केलेय त्यांनी
- दानधर्मातही धोका; श्रीराम मंदिरासाठी दिलेले ‘इतक्या’ कोटींचे चेक ‘बाउन्स’..!