Take a fresh look at your lifestyle.

इंधन भडका : डाळींच्या दरातही झाली ‘एवढी’ वाढ; वाचा, काय आहेत दर

पुणे :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणारी ही वाढ पाहता देशातील अनेक शहरांत शंभरी गाठली आहे.

Advertisement

या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहे. इंधन दरवाढ कधी थांबणार, याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. पेट्रोल-डीझेल महागल्याने सर्वच वस्तू महागल्या आहेत. अशा ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. 

Advertisement

या पेट्रोल-डीझेल दरवाढीचा फटका व्यवसायालाही बसतो आहे. परिणामी दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या अनेक वस्तूच्या दरातही वाढ झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (APMC) धान्य मार्केटमध्ये डाळींचे भाव वाढू लागले आहे. डिझेल पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आवक घटल्याने पाच ते दहा रुपयांनी डाळीचे भाव (Pulses Prices) वाढले आहे.

Advertisement

दोन महिन्यांपूर्वी असलेल्या उडीद डाळीच्या भावात वाढ होऊन ही डाळ 90 ते 115 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मूगडाळ 95 ते 115 किलो दराने विकली जात आहे. तर हरभरा डाळीमध्ये आवक वाढल्यामुळे घट झाली असून 57 ते 63 रुपये किलोवर पोहोचली आहे. मसुर डाळ 60 ते 63 रुपये किलो झाली असून त्यामध्ये घट झाली आहे. तुरडाळीची आवक वाढल्यामुळे घट झाली असून 78 ते 98 रुपये किलो झाली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply