Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी आंदोलन अपडेट : ‘त्यासाठी’ सरकारचा प्रतिदिन होतोय 50 लाखांचा खर्च..!

दिल्ली :

Advertisement

दिल्लीतील शेतकरी आंदोलन म्हणजे सरकारच्या दृष्टीने लक्ष न देण्याची गोष्ट बनली की काय, असेच चित्र आहे. कारण, यावर अजूनही तोडगा काढण्याचे काम केंद्र सरकारने केलेले नाही. त्यातच या आंदोलनाच्या ठिकाणी सरकारला दर दिवसाला किमान 50 लाख रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

Advertisement

शेतकरी आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्ते बंद पडल्याने फ़क़्त उद्योगांचे नुकसान होत नसून सरकारला दररोज तब्बल 50 लाख रुपये खर्च करावे लागतात. हे पैसे सुरक्षा व्यवस्था आणि सुविधांवर खर्च करण्यात येत आहेत. यासाठी तैनात निमलष्करी दलांचा पगारही सरकारला करावा लागत आहे. अशाप्रकारे शेतकरी आंदोलन सरकारच्या तिजोरीवर मोठा भार टाकत आहे.

Advertisement

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी कुंडली व टीकरी बॉर्डर येथे तळ ठोकला आहे. या दोन्ही ठिकाणी अर्धसैनिक दलाच्या जवळपास 26 कंपन्या तैनात आहेत आणि 4 ठिकाणी रिझर्व्ह पोलिस तैनात आहेत. सशस्त्र दलाच्या जवानांची मागणी सुरक्षेसाठी केल्यावर त्याचा सर्व खर्च राज्य सरकारला करावा लागतो.

Advertisement

राज्य सरकारने त्यांच्या पगारापासून केटरिंग आणि राहण्यापर्यंतच्या सर्व व्यवस्था केल्या पाहिजेत असा नियम आहे. त्यानुसार अशा प्रकारे सुरक्षेसाठी सुमारे 13 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. इतर व्यवस्थांवरही दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जात आहे.

Advertisement

शेतकर्‍यांचे आरोग्य तपासण्यासाठी येथे 20 आरोग्य कर्मचाऱ्यांचे समूह कार्यरत आहेत. तर 150 हून अधिक स्वच्छता कामगार साइटवर काम करतात. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाने 120 शौचालये, सुमारे 24 पाण्याचे टँकर, कॅमेरे, तंबू, गादी व इतर व्यवस्था केली आहेत. अग्निशमन दलाच्या 18 गाड्या इथे आहेत. त्यासाठीचे कर्मचारीही तैनात आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply