Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : म्हणून वाझेंना 10 दिवसांची एनआयए कोठडी..!

मुंबई :

Advertisement

गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 10 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंबईतील अँटीलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक वाझे यांना ही कोठडी देण्यात आलेली आहे.

Advertisement

शनिवारी 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयएने सचिन वाझेंना अटक केली होती. एनआयच्या वकिलांनी वाझेंची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केल्यावर त्यांना न्यायालयाने 10 दिवसांची कोठडी दिली आहे.

Advertisement

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या गाडी प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणे(NIA)च्या हाती मोठे यश आले आहे. इनोव्हा गाडीबाबत वेगळी माहिती पुढे आल्याने अनेक शंका-कुशंका उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

कारण, क्राइम ब्रांचमध्ये असताना सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी हीच कार वापरत होते. दरम्यान, सचिन वाझे यांचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका स्कॉर्पियो कारजवळ दिसत आहेत. ही कार हूबेहूब अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार सारखी आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply