Take a fresh look at your lifestyle.

म्हशीचा बड्डे ‘वाजवले’ बारा : या पठ्ठ्याने साजरा केला म्हशीचा बड्डे; पडला भलताच महागात

ठाणे :

Advertisement

आजकाल बड्डे साजरा करण्याच्या विविध पद्धती समोर आलेल्या आहेत. अशातच शेतकरी मंडळींनी बैल-गाय यांचाही बड्डे केले असल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आलेल्या आहेत.

Advertisement

मात्र ठाणे जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने मोठ्या हौसेने केक कापून आई फटाके उडवून आपल्या बैलाचा बड्डे साजरा केला. मात्र हा बड्डे या शेतकऱ्याला आणि त्याच्या मित्राला भलताच महागात पडला आहे.

Advertisement

कोरोना संचारबंदीचे नियम मोडत बड्डे साजरा केल्यामुळे म्हणून किरण म्हात्रे नामक युवकावर थेट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या किरणभाऊंनी आपल्या म्हशीच्या वाढदिवशी खूप मोठे आयोजन केले ते इतके आनंदित झाले होते की त्यांनी कोरोनाचा धोका पत्करून पार्टी आयोजित केली. या सेलिब्रेशनमध्ये बर्‍याच लोकांनीही भाग घेतला. यावेळी कोणीही मास्क घातला नव्हता किंवा सोशल डिस्टेंसिंग देखील ठेवले नाही.

Advertisement

अवघ्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या भल्या झपाट्याने वाढत असताना असे प्रकार चालू आहेत. अखेर या युवकाला म्हशीचा बड्डे साजरा करणे भलतेच महागात पडले असून आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

आयपीसी कलम 269 (प्राणघातक संसर्ग पसरवण्याचा कायदा) या अंतर्गत त्याच्यावर कारवाई होणार आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply