Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामुळे’ सचिन वाझे झाले भयभीत; भीतीपोटी उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई :

Advertisement

मनसुख हिरेन प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. दरम्यान विधानसभेत गृहमंत्र्यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. सचिन वाझे हे मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मनसुख हिरेन प्रकरणानंतर भाजपने त्यांना अटक करण्याची थेट मागणी केली होती.

Advertisement

मनसुख हिरेन प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची एकाच दिवसात २ वेळा बदली करण्यात आली आहे. अशातच वाझे यांना अटकेची भीती असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

सचिन वाझे यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून दहशतवाद विरोधी पथकानेही त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य कारवाईची शक्यता लक्षात घेऊन वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. 

Advertisement

हिरेन प्रकरणात वाझे यांना अटकेची भीती सतावू लागली आहे. त्यातूनच त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असून या अर्जावर १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply