मोठी बातमी… महाविकास आघाडीचे ‘हे’ मंत्रीही कारखान्यामुळे अडचणीत; साखर आयुक्तांनी केली थेट ‘ही’ कारवाई
औरंगाबाद :
शरद सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा, औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आता अडचणीत आले आहेत. त्यांच्या शरद सहकारी साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहेत. त्यांच्यावर शेतकऱ्यांची ऊसाची देणी थकल्यामुळे जप्तीचे आदेश काढल्याचे आरोप आहेत.
शेतकऱ्यांची तब्बल 17 कोटी 49 लाख रुपयांची देणी थकल्यामुळे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्यावर जप्ती आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साखर आयुक्तांनी कारखाना जप्त करण्याचे आदेश काढले. या कारवाईनंतर याविषयी बोलताना आपण थकित रक्कम भरली असल्याचा दावा मंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे.
संदिपान भुमरे यांच्या निमित्ताने ठाकरे सरकारमधील सलग तिसर्या मंत्र्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भुमरे हे 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत. ठाकरे कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!